Saturday, June 22, 2019

शेतकरी- तो मावळणारा सुर्य


शेतकरी- तो मावळणारा सुर्य
हसतील लोक मला
म्हणतील हा खुळेपणा
अथवा ठेवतील नाव हजार
पण ना सपणार कधी
हा रे माझ्या कर्जाचा बाजार
संपलोय, दमलोय मी
ना राहिले सहन करण्याचे त्राण मला
कडकीचे रे दिवस आले
निसर्गही आता साथ देईना
तरीही सावकार आपले कर्ज सोडेना
शेतजमिनी गेल्या
भुकेपाई संपतोय हा संसार
तरीही पिळवटुन घेतोय कर्ज
सावकार भरी आपल घर
सात्वंनाच रूप घेऊन
येती नेते अनेक
भाषणबाजी त्यांची हवेवर ऊडती रेत
देऊ सुट कर्जाची, सुधरवु परिस्थिती शेतकय्राची.
                                    
                                     - श्रुतिका धानबा

Monday, June 17, 2019

वेडे मनवेडे मन

मन हे का वेडावलेले.
क्षणोंक्षणी घेऊन येई तुझ्या आठवणींचा उमाळा.
मन हे का तुझ्यात गुंतलेले.
असताना तुझ्यापासुन लांब गेलेले.
कधी तुझ्या आठवणींमध्ये हसणारे.
तर कधी रडणारे.
मन हे का तरसलेले.
तुझी भेट होणार नाही हे जाणुन असलेले.


Saturday, June 15, 2019

गावात हिंडत होतो.

गावात हिंडत होतो,
मनसोक्त होऊन.
ती लाजुन मला पाहुन गेली,
केला पाठलाग थोडासा मी ही.
पण कुठे, कधी विरुन गेली कळलच नाही.
तिने केलेल्या स्पर्क्षाने पायवाटही गंधाळली होती.
पानांची सळसळ तिच्या सौद्याचे वर्णंन गात होती.
मी मात्र असाच वाटेला तिच्या नजर लावुन होतो.
मन मुक्त होऊन गावात हिंडत होतो.

Friday, June 14, 2019

फयान


फयान 


                  " पप्पा... पप्पा...माका पण येवचा हाय... म्हावरा धरूक...." मी पप्पांन जवळ हट्टच लावला होता..." नाय आज नको बंधु... आज जाम वारो हाय... वातावरण काय बरोबर दिसत नाय हाय... तुका मी ना पुढच्या वेळी नेतय हह.... "
"नाय... मी नाय... माका आजच येवचाय... "मी काही ऐकायला तयारच नव्हतो. शेवटी माझ्या हट्टा पुढे पप्पांनी हात टेकले आणि ते मला न्हायला तयार झाले... मी आनंदात उड्या मारत आई कडे गेलो..." आई.... माझो पण डबो भर मी पण जातय हाय... पप्पा बरोबर..."
              मी, पप्पा , आमचा खलाशी अप्पा... असे आम्ही निघालो समुद्रात मासे पकडायला... मी जाम खुष होतो.. तस ही काय माझी पहिली वेळ नव्हती, या आधी मी खुप वेळा गेलो आहे पप्पांन बरोबर मासे पकडायला... पण दहावीच्या एक्सट्रा क्लाँसेस मुळे मला यावर्षी जाता आल नव्हत...
आम्ही जेटीवर आलो आणि पप्पांनी मला तिकडेच थांबायला सांगुन ते बोट जेटीजवळ आणायला गेले. पप्पांनी बोट जवळ आणली आणि मी लगेच ऊडी मारूनच बोटीत चढलो.
          बंधु... तुका किती वेला सांगला हाय... पाय भिजवन चढ बलावात म्हणुन...  आपली माऊली हाय ती... तेच्यावर आपला पोट हाय... यावेळी पण मी पाण्यात पाय न भिजवताच बोटीत चढलो होतो...
       पप्पांनी बोट चालु केली आणि आम्ही निघालो समुद्राच्या दिशेने. मी पप्पांच्या हातातुन सुकाणू घेतल... आणि बोटीला दिशा देऊ लागलो... बोट हळुहळु खाडीतुन बाहेर पडत होती... सपसप पाणी कापत बोट समुद्राच्या तोंडाजवळ आली आणि पप्पांनी सुकाणू स्वःता कडे घेतल...
बंधु... तु बस जा पुढ्या आज लाटी लय दिसतायत...
आणि पण मी पप्पांच्या जवळच बसलो... आज खरच समुद्र जरा वेगळा वाटत होता... पप्पा पाठोपाठ येणाय्रा लाटा चुकवत होते आणि मी पुर्णगड किल्ला बघण्यात गुंतलो होतो... लालसर सुर्यप्रकाशात किल्ल्याचे बुरूज ऊजळुन निघाले होते.
              आता बोट खाडीच्या ऊथळ पाण्यातुन समुद्राच्या खोल पाण्यात शिरली होती.. अजुन एक तासाच अंतर पार केल की मासे पकडण्यासाठी जाळ पाण्यात सोडायची जागा येणार होती... मी मस्त बोटीच्या काठावर बसुन समुद्राच पाणी अप्पाच्या अंगावर ऊडवत होतो... त्याच वेळेला अप्पा ओरडला...   " बंधु.... थय बघ... गाद्यांची साय जाताय... बघ कशे ऊसळतायत... 10-12 हायत..."  मी गरकन मान फिरवुन त्याने बोट केलेल्या दिशेने बघु लागलो... तर चक्क आमच्या बोटीच्या दुसय्रा बाजुला डाँलफिनचा कळप ऊड्या मारत जात होता... त्या कळपा कडे बघता बघता कधी पोचलो ते समजलच नाय.
           "बंधु... बघ...14 - 15 वाव पाणी झाला काय..." मी छोटा नांगर बाधलेली दोरी घेतली आणि ती पाण्यात टाकली, दोरी जस जशी खाली जात होती तसा मी त्यावरच्या गाढी मोजत होतो... 14 वी गाढ आली आणि नांगर खाली तळाला टेकला...
पप्पा... 14 वाव हाय पाणी... मी पप्पांना सांगीतल...
" हहह... बंधु... आता जाळा सोडुया.. तु ऊडठ रींगा... अप्पा टाकील बोया..." पप्पांनी बोटीची स्पिड कमी केली आणि  मी एक - एक रिंग पाण्यात टाकत होतो.. खुप दिवसानंतर आल्या मुळे मी चुकत होतो...
"बंधु... ता बघ... ता रिंग... ता नाय... ता...
सोपली आता... लास्टचा एक  हाय... "
मला पप्पा सांगत होते.
"बंधु... शेवाक झिगा बांध... आणि सोड दोरी..."
मी लुकलुकणारा दिवा शेवटच्या जाळयाला बांधला.. आणि त्याची दोरी बोडदाला बांंधुन ठेवली.. आता सर्व जाळ  सोडुन झाली होती आणि मी माकळेचा गळ पाण्यात टाकुन बसलो...
असच 10-15 मी. गेली असतील आणि पप्पांचा लक्ष ढगांन कडे गेला.
"अप्पा... आज वातावरण बरोबर नाय वाटत हाय... वारो पण वाढलो हाय... ढग काले झाले हायत..."
"होय... लाटी पण मोठे येतायत..." अप्पा पण बघत होता
पप्पांच आणि अप्पाच कस बोलण चालुच होत आणि.... बोटीवरचा मोबाईल वाजायला लागला....
मी धावतच केबीन जवळ गेलो आणि काँल उचलला...
"सुरेश.... हायस खय... वादल झाला हाय... 20-25 वावात जाम पावस पडताय... लवकर बंदरात जावा..."
माझे आन्ना बोलत होते.
"आन्ना... आम्ही 14 वावात हावत... ईकडे पण जाम वारो हाय...  मी सांगतय पप्पांक... "
"पप्पा.... पप्पा... वादल झाला हाय... आन्नान... लवकर बंदरात जावक सांगलान हाय...
अप्पा.... मोठा बोया काड खणातशी... आता जाळा ईकडेच सोडुन जावया...
बंधु... लोयली ओड लवकर... मी ईस्टाट मारतय..."
अप्पांन लगेच बोया बांधुन सर्व जाळ पाण्यात सोडली.. आणि मी नांगर ओडला...
बंधु... वाव लक्षात ठेव...  वादळ शांत झाला की येवया जाला न्हेवक...
आता वातावरण खुपच बिघडल होत... वाय्राचा वेग ताशी 250-300 झाला होता... लाटा 10-12 फुटांन पर्यत ऊसळत होत्या... विजा चमचमत होत्या... गडगडात होत होता... कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अस वाटत होत...
पप्पांनी बोट चालु केली आणि आम्ही बंदराच्या दिशेन जाऊ लागलो...
पाण्याचा वेग बोटीच्या वेगापेक्षा जास्त होता... बोटी पेक्षा 10-12 फुट उंच ऊठणाय्रा लाटा बघुन... आम्ही सर्वच घाबरलो होतो...
तितक्यात आमच्या मागुन खोल समुद्रात गेलेल्या सर्व बोटी जथ्याने येताना दिसल्या... जो तो.. जिवाच्या आकांताने फुल स्पिडवर बोट पळवत होता.
आमच्या बोटीच्या सायलेंसर मधुन आता आग बाहेर येऊ लागली होती...
सगळी कडे अंधारून आल होत... वादळापुढे जणु सुर्याने पण हात टेकले होते...
लाटांची ऊंची हाता पुर्वी पेक्षा वाढली होती... लाटांच्या जोरदार तडाक्याने बोटीत पाणी यायला लागल होत...त्यात भर म्हणुन की काय आता पाऊस पण सुरु झााला होता.दिशा भरकटु नये म्हणुन पप्पा आपल कसब लावत होते...
बोटीतल वाढत पाणी बघुन मी आणि अप्पांन... बादली घेऊन ते ऊपसु लागलो... जेवढ पाणी ऊपसत होतो तेवढच पुढची येणारी लाट पाणी बोटीत भरत होत...
आता सगळी कडे अंधार पडला होता... ढगांचा गडगडाट... बोटींचा आवाज... माणसांच ओरडण... सर्व बोट वाले एकमेकाला आवाज देत होते... कोण मागे तर नाय राहिला बघत होते....
घरून सारखे फोन येत होते... आई फोनवर रडत होती...
तुका... सांगला होता नको जाव... बघलास...आता काय झाला ता... मी आईला समजवत होतो... काय नाय झालाय... सगला वेवसतीत हाय... आम्ही यायले हावत बंदरा जवळ..
बोटीतल पाणी ऊपसुन ऊपसुन हात थकायला लागले होते...
चमचमणाय्रा विजेच्या प्रकाशात फेसाळलेला समुद्र अजुनच भयावय वाटत होता.
पुर्णगडचा धोकाची सुचना देणारा टाँवर आता दिसु लागला होता. त्याच्यावरचा लाल दिवा वादळाची भिक्षणता दर्शवत होता.
आम्ही खाडीच्या तोंडावर आलो आणि समोवरच दृश बघुन मी भितीने थरथरायला लागलो होतो...
पप्पा जाम मोठे लाटी हायत... जावक वाटच नाय हाय... मी जवळ जवळ ओरडलो...
               पप्पांनी बोट तिथेच थांबवली आणि आम्ही मागुन येणाय्रांची वाट बघु लागलो... समोरच दृश बघुन सर्वच बोटी थांबल्या... उंचच... उंच, फेसाळलेल्या लाटा, खवळलेला समुद्र मनात धडकी भरवत  होता. समोरच दृश बघुन कोणीच पुढे जात नव्हत. चार-पाच लाटानंतर येणारी गँप बघुन सर्वांनी त्याच वेळेला सर्वांनी आत घुसायच ठरवल... सर्वजण एकदम खाडीत शिरु लागले... आमच्या पुढे असणाय्रा आन्नाची बोट त्या लाटांत जोरात हिसके खात होती... लाटांच्या जोरदार तडाक्याने ऊसळणारे पाणी तोंडावर आदळत होत.. आम्ही सर्व पुर्ण भिजलो होतो...एकामागोमाग येणाय्रा लाटा बोटीला उंच ऊचलचन अचानक धपकन आपटत  होत्या...
       शेवटी 20-25 मीनटांच्या जोरदार संघर्षानंतर आम्ही खाडीत प्रवेश केला... सर्व बोटी जेटीला येवुन लागल्या... गावातली सर्व माणस जेटीवर जमली होती. सर्वांचे चेहरे भितीने व्यापुन टाकले होते... सर्वांच्या नजरा आपल्या माणसांना शोधत होत्या...
सर्व बोट वाले कोण राहिलय काय मागे ते बघत होते....
दिवाकर.... दिवाकरचा बलाव नाय आयला हाय....
अस कोणतरी ओरडल.... सगळीकडे भयान शांतता पसरली...
लोक आपसात कुजबुजच  लागले... काय झाल असेल ? कशे असतील ? सर्व वातावरण तंग झाल होत...
सर्व बोट वाल्यांनी सकाळ झाली की शोधायला जायच ठरवल... आणि वादळ शांत होण्याची वाट बघु लागले...
           सकाळ पर्यंत सर्व वातावरण शांत झाल होत... वादळाने झालेली दुरदशा स्पष्ट दिसत होती...  ऊगवत्या सुर्याबरोबर सर्व बोट वाले दिवाकरला शोधायला निघाले...


                                                                   साहिल धानबा.

शेतकरी- तो मावळणारा सुर्य

शेतकरी- तो मावळणारा सुर्य हसतील लोक मला म्हणतील हा खुळेपणा अथवा ठेवतील नाव हजार पण ना सपणार कधी हा रे माझ्या कर्जाचा बाजार संपलोय, ...